कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा

0
398

पिंपरी, दि. १९ (पीसीबी): कुत्रा चावल्याने कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 फेब्रुवारी रोजी पिंपळे सौदागर येथे घडली असून याप्रकरणी 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितन सत्यादास (वय 33, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गाडीची चावी घेत असताना आरोपी महिलेच्या मालकीच्या कुत्र्याने फिर्यादीस चावा घेतला. त्यात फिर्यादी जखमी झाले. कुत्र्यापासून मानवी जीवितास धोका टाळण्यासाठी आरोपी महिलेने पुरेशी खबरदारी घेतली नसल्याने हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.