पिंपरी चिंचवड शहर जिल्हा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने शहराध्यक्ष कुणालभाऊ वाव्हाळकर व उपाध्यक्ष धर्मपाल तांतरपाळे यांच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम युवक शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच काही युवकांचा पक्षप्रवेश करण्यात आला.
खालीलप्रमाणे पदनियुक्ती करण्यात आली –
भारत खरात – युवक कार्याध्यक्ष
सिद्धांत जगताप – युवक उपाध्यक्ष
राहुल नितनवरे – युवक सरचिटणीस
दिलीप मोरे – संपर्क प्रमुख
निखिल केरणाले – संघटन सचिव
क्रांतिदीप जाधव – युवक उपाध्यक्ष
नवनियुक्त सर्व युवक पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास चंद्रकांताताई सोनकांबळे, अझीजभाई शेख, विनोद चांदमारे, बाबा सर्वदे, दादा शिरोळे, राजू उबाळे साहेब, राजेंद्र कांबळे, विलास पाटील, रुक्मिणीताई पाटील, मायरा मॅडम, बाळासाहेब गायकवाड, योगेश भोसले, किरण सामिंदर, संतोष देंगळे, विकास गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराजदादा भास्कर यांनी केले तर आभारप्रदर्शन सोमंथजी उबाळे यांनी केले.













































