कुणाल आयकॉन रस्ता काँक्रीटीकरणाचे काम लवकर सुरू करावे- शत्रुघ्न काटे

0
149

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांना लेखी निवेदन दिले आहे.आपल्या या लेखी निवेदनात नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनीकुणाल आयकॉन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.आपल्या लेखी निवेदनात नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजगी व्यक्त करीत लिहले आहे की प्रभाग क्र.२८ हे स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. परंतु या प्रभागातील प्रमुख रहदारीचा रस्ता असलेला कुणाल आयकॉन रोड हे स्मार्ट सिटी अंतर्गत वगळण्यात आलेला आहे. दिवसेंदिवस सदर रस्त्याची होत चाललेली दुरवस्था ही चिंतेची बाब असून नागरिकांच्या अपघाताचे प्रमाणात देखील लक्षणीय वाढ होत आहे. यावर प्रशासनामार्फत नेहमी तात्पुरते उपाय म्हणून डागडुजी करण्यात येते परंतु ते देखील काही काळानंतर पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती होते.

कुणाल आयकॉन रस्ता काँक्रीटीकरण करण्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सदर रस्ता विकसित करण्यासाठी केली जाणारी निविदा प्रक्रिया पूर्णपणे रखडलेल्या स्वरूपात असून याबाबत कुठलेही सकारात्मक प्रतिसाद पालिके मार्फत मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे.म्हणून प्रभागातील कुणाल आयकॉन रस्ता लवकरात लवकर विकसित करण्याचा दृष्टीने सकारात्मक विचार करीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सुरू करावे ही अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.