कुटुंबास मारहाण करीत केला विनयभंग

0
43

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : किरकोळ कारणावरून झालेल्‍या भांडणात एका कुटुंबाला मारहाण करण्‍यात आली. तसेच कुटुंबातील तरुणीचा विनयभंग करण्‍यात आला. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्‍या सुमारास घडली.

आकाश आण्णाराव वाकळे (वय ३०, रा. विदयानगर, कोकरे मंडप समोर, चिंचवड) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत ४० वर्षीय पुरूषाने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी वाकळे याने किरकोळ भांडनाचा राग मनात धरुन फिर्यादीस शिवीगाळ व हाताने मारहान केली. तुला आज जिवेत सोडणार नाही, अशी धमकी दिली. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांची आई, वडील व बहिण यांनाही शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. फिर्यादिची बहिण हिच्‍याशी अशोभनिय वर्तन करून तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.