कुटुंबाचा जीव महत्वाचा असेल तर २० लाख तयार ठेव; जीवे मारण्याची धमकी देत मागितली २० लाखांची खंडणी

0
257

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – महिलेला मेसेजवरून जीवे मारण्याची धमकी देत २० लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) सकाळी मोरवाडी चौक, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी ५१ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी सकाळी घरी असताना सव्वानऊ वाजताच्या सुमारास मोबाईल फोनवर एक मेसेज आला. तुझ्या पूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे. कुटुंब महत्वाचे असेल तर २० लाख रुपयांची तजवीज कर. पैसे मिळाले नाहीत तर मी माझे काम करीन. आज रात्रीपर्यंत उत्तर दे, असा हिंदीतून मजकूर लिहिला होता. याबाबत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.