कुंडमळा येथे सेल्फी काढताना पाय घसरून दोनजण वाहून गेले

0
132

देहूरोड, दि. ५ – इंद्रायणी नदी कुंडमळा येथे सेल्फी काढत असताना पाय घसरून दोनजण वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज (दि.०५) रोजी गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली आहे.

श्रेया सुरेश गावडे (वय १७ वर्षे) आणि रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे (वय २२ वर्षे) चिंचवड गाव असे वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदी कुंडमळा येथे आज सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास चिंचवड गाव येथील सहा मुले व दोन मुली फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी श्रेया गावडे आणि रोहन ठोंबरे हे दोघे कुंडमळा देवीचे मंदिरा शेजारी पाण्याच्या कडेला सेल्फी काढत असताना पाय घसरून नदीच्या पात्रात पडून वाहून गेले. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी वन्यजीव आपदा संस्था मावळ यांचे मदतीने शोध कार्य सुरू करण्यात आले आहे, तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.