कीर्तन सप्ताहाची सांगता काळभोरनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात १० ऑगस्ट पासून कीर्तन – प्रवचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .

0
2

दि . १८ . पीसीबी – या सप्ताहात प्रत्येक दिवशी नामवंत कीर्तन कारांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनाने भक्तिमय वातावरण केले होते .
या कीर्तन सप्ताहाचा सांगता समारंभ सोहोळा शनिवार दिनांक.१६ ऑगस्ट रोजी गोपाल काला निमित्त काल्याचे कीर्तन ह. भ. प. श्री गणेश महाराज साळुंखे ( कराड ) यांनी केले,
यावेळी विशेष उपस्थिती श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त अँडव्हॉकेट रोहिणी ताई पवार , श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू विश्वस्त ह .भ .प माणिक महाराज मोरे – इनामदार , खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव काळभोर, नंदू साळुंखे इत्यादी उपस्थित होते .
काल्याची सांगता महाप्रसादाने झाली
याप्रसंगी शेकडो वारकरी भाविक उपस्थितानी हरिकीर्तनाचा आनंद घेतला.

कीर्तन सप्ताहाचे आयोजन
शंकरशेठ काळभोर , अन्नप्रसाद सोमनाथशेठ काळभोर यांनी केले,
तर नियोजन , विशाल बाळासाहेब काळभोर, वैशालीताई काळभोर , अप्पासाहेब बागल , हनुमान भजनी मंडळ आकुर्डी समस्त काळभोर परिवार यांनी केले.