किल्ले लिंगाणा सर बालरणरागिनींचे गिर्यारोहण

0
353

आळंदी,दि.०५(पीसीबी) – पुणे दुर्गजागर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत मोहिमेत मावळे व बालरणरागिणी यांनी चित्तथरारक असा किल्ले लिंगाणा सर केला. महाड पासून इशान्य दिशेला सुमारे १६ किलो मीटर अंतरावर सह्याद्री पर्वत रांगेत तोरणा व रायगड किल्ल्याच्या दरम्यान किल्ले लिंगाणा आहे. या मोहिमेत बाल मावळे सहभागी झाले होते. किल्ले लिंगाणा सर करताना ६ ते ९ वय वर्षाचे तीन बालरणरागिनींचे चित्तथरारक प्रवास झाला.

शिवकाळात ह्या किल्ल्याचा कारागृह म्हणून उपयोग केला जात होता. अवघड अशा या दुर्गावर शत्रूंना कैदेत ठेवले जात होते. समुद्र सपाटी पासून सुमारे ३१०० फूट उंच चढाईला कठिण असा लिंगाणा किल्ला सर करणे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते.

गुरुवारी ( दि.३ ) दुर्गजागर प्रतिष्ठान चे संतोष जगताप, किरण थोरात, विशाल कदम, स्वप्निल कंद आकाश कोहली व ओमकार चव्हाण या मोहिमेत सहभागी झालेल्या चिमुकल्या रणरागिणी आरूषी संतोष जगताप ( वय ७ वर्ष ), स्वरा किरण थोरात ( वय ६ वर्ष ), ज्ञानेश्वरी स्वप्निल कंद ( वय ९ वर्ष ) यांनी वडिलां सोबत अवघ्या २२ तासात लिंगाणा किल्ला सर केला. या मोहीमेत सह्याद्रीपुत्र ट्रेकर्सचे सोमनाथ शिंदे, राम धरपडे यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनी आता पर्यंत १२ वेळा तर दुर्गजागर प्रतिष्ठानला घेऊन १३ वेळा लिंगाणा किल्ला सर केला असल्याचे संतोष जगताप यांनी सांगितले.