किरीट सोमय्या यांच्या एका आक्षेपार्ह व्हिडिओतील ती महिला कोण, महाराष्ट्राला कळायला हवं

0
313

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एका आक्षेपार्ह व्हिडिओवरुन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ज्या महिलेनं हे व्हिडिओ समोर आणले आहेत, ती महिला नेमकी कोण आहे? हे महाराष्ट्राला कळायला हवं अशी मागणी शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. परब म्हणाले, गेल्या वर्षी खालच्या सभागृहात पेनड्राईव्ह फुटले आज वरच्या सभागृहात तो फुटतोय. कोणाच्याही राजकीय आयुष्यात बदनामी काय असते. एखाद्याच्या कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा तो व्यक्ती किती त्रस्त होतो, याचे आम्ही साक्षीदार आहोत.

छगन भुजबळ इथं बसलेत ते अडीच वर्षे तुरुंगात होते, न्यायालयानं त्यांना निर्दोष सोडलं. तुमच्या राजकीय करियरवर जे आरोप होतात, त्यामुळं त्यांची राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होतात. ज्यांचा व्हिडिओ बाहेर आला आहे त्यांनी अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत.

त्यामुळं या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी व्हायला हवी. तसेच ज्या महिलेनं हा व्हिडिओ समोर आणला आहे ती महिला नेमकी कोण आहे? हे महाराष्ट्राला कळायला हवं, अशी मागणी यावेळी अनिल परब यांनी सभागृहात केली.