किरीट सोमय्या यांच्या अश्लील वर्तनानिमित्त भाजपा नेत्यांचे चरित्र उघड- आप

0
283

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. त्यांच्यासारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल होत आहे हे भाजपाच्या ईतर अनेक नेत्यांच्या चरित्राचे ट्रेलर आहे, महिलांचे शोषण करण्यात भाजपाचे अनेक नेते एक्सपोज होत आहे, त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी येतात परंतु केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे गुन्हे नोंदविले जात नाहीत, किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांनी सोमोटो कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आप महीला अध्यक्ष सीता केंद्रे यांनी केला आहे.

भाजपाच्या( भाजपाचे अनेक नेते सार्वजनिक जीवनात वागताना लोकांसमोर त्यांचे वेगळे चरित्र दाखवितात आणि खऱ्या जीवनात बंद दरवाज्याच्या आत ते आपले गुण दाखवीत असतात कधी महिलेला धमकावून तर कधी महिलेचा गैरफायदा घेत अशा प्रकारे महिलांचे शोषण केले जात आहे असेही सीता केंद्रे यांनी म्हटले आहे.