किरीट सोमय्यांवर पुन्हा मोठी जबाबदारी

0
166

मुंबई, दि. १० – आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसात जाहीर होणार आहे. त्यापूर्वी पक्षांकडून राजकीय नेत्यांवर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यात येत आहे. अशातच किरीट सोमय्यांवर पुन्हा एकदा पक्षांतर्गत कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्यांवर पक्षाकडून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने ‘विधानसभा निवडणूक संपर्क प्रमुख’पदी किरीट सोमय्या यांची निवड केली आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवर सोमय्यांनी आरोप केले होते. त्यातीलच काही नेते महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्यावर पत्राद्वारे ‘निवडणूक संपर्क प्रमुख’ पदाची जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किरीट सोमय्या पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे.