किराणा दुकान फोडून 45 हजारांच्या सिगारेट चोरीला

0
146

भोसरी, दि. 26 जुलै (पीसीबी) – किराणा मालाचे दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातून 45 हजार रुपये किमतीच्या सिगारेट चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी (दि. 25) सकाळी शंकर ट्रेडर्स, शास्त्री नगर, कासारवाडी येथे उघडकीस आली.सुनील लक्ष्मणदास मंगनानी (वय 38, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कासारवाडी मधील शास्त्रीनगर येथे शंकर ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप लावलेली कडी तोडून शटर उचकटले. त्यावाटे दुकानात प्रवेश करून 45 हजार रुपये किमतीचे सिगारेट आणि दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.