दि.१३(पीसीबी)-मोटारसायकलवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणांवर लाकडी काठी व दगडाने हल्ला केला ही घटना भोसरीतील शांतीनगर परिसरात गुरुवारी (१२ फेब्रुवारी) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
ओंकार प्रसाद (१८), लक्ष्मीपुत्र धनगर (२२) व सागर गुंजाळ (१९, सर्व रा. शांतीनगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गोविंद बासू चव्हाण (२५, शांतीनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शांतीनगर, भोसरी येथे झालेल्या किरकोळ वादातून आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादी व त्याच्या भावास लाकडी काठीने मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.











































