किरकोळ वादातून तरुणास मारहाण

0
239

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला बाहेर बोलावून घेत त्याला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १२) रात्री मिलिंद नगर, पिंपरी येथे घडली.

तौफिकचाँद शेख (वय १७, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम रोकडे (वय २०), अक्कू भोरे (वय १९), विशाल अहिरे (वय २४), अनिकेत उर्फ अंड्या गायकवाड (वय १९, सर्व रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नवमहाराष्ट्र शाळेजवळ असलेल्या एका चहाच्या दुकानात किरकोळ वाद झाला. त्यातून संशयित आरोपींनी फिर्यादी यांच्या मित्राला फोन करून फिर्यादीस बाहेर बोलावून घेतले. फिर्यादी मिलिंदनगर पिंपरी येथील छोटी मस्जिद येथे गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. एकाने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.