किरकोळ कारणावरून वृध्द आईला मुलाकडून मारहाण

0
79

दि. १६ जुलै (पीसीबी) हिंजवडी,
बंगल्याचे तोडफोड करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने मुलाने आपल्या 67 वर्षीय आईला मारहाण केली आहे. ही घटना 8 जून 2024 रोजी जांभे, मुळशी येथे घडली.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आईने फिर्यादी दिली असून पोलिसांनी मुलगा संतोष साहेबराव मांदळे (वय 43 रा मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांचा मोठा मुलगा आहे. फिर्यादी राहत असलेल्या बंगल्याच्या वरती काम करत असताना आरोपीने बंगल्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांनी त्याला तोडफोड करू नको असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली या मारहाणीमध्ये फिर्यादी यांच्या उजव्या हाताला व पायाला फ्रॅक्चर झाले आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात मुला विरोधात तक्रार करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.