किरकोळ कारणावरून वृद्धास मारहाण

0
152

माझ्या गाडीच्या टायरची शुटींग ग्रुपवर कशाला टाकली, असा जाब विचारल्याने एकाने वृद्ध व्यक्तीस मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 20) रात्री दहा वाजता कोहिनूर हाउसिंग सोसायटी, घरकुल, चिखली येथे घडली.

दत्तात्रय लक्ष्मण शिंदे (रा. कोहिनूर हाउसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मधुकर रभाजी काळोखे (वय 60, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळोखे हे त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये त्यांची गाडी पुसत होते. त्यावेळी काळोखे यांनी आरोपी शिंदे याच्या पत्नीला ‘तुमच्या पतीने माझ्या गाडीच्या टायरची शुटींग कशाला ग्रुपवर टाकायची’ असे विचारले. त्यावरून आरोपीने काळोखे यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.