किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांवर जिवघेणा वार

0
445

तळेगाव दाभाडे, दि. २५ (पीसीबी) -केवळ, पहातोय या कारणावरून चार ते पाच तरुणांनी मारहाण करत हत्याराने वार करत खूनी हल्ला केली. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार शनिवारी (दि.23) तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेज जवळ घडला.

याप्रकरणी कौस्तुभ किसन जगताप (वय 21 रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली असून मोहन उर्फ चिक्या शिंदे, शाहरूख शेख, वरूण माने, राज साठे व इतर दोन इसम यांच्यावर गुहा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॉलेजवरून घरी जात असताना फिर्यादी यांनी पाहिले या कारणावरून आरोपींनी भांडणास सुरुवात केली. यावेळी हाताने व धरदार शस्त्राने मारहाण करत गंभीर जखमी केले. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.