आळंदी, दि.1 (पीसीबी)
किरकोळ कारणावरून दोन मेहुण्यांना मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी जखमी तरुणाच्या बहिणीच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी चिंबळी येथे घडली.
अशोक ज्ञानोबा शिंदे (वय २२, रा. चिंबळी), मोहन शिंदे अशी जखमींची नावे आहेत. अशोक शिंदे यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दामोदर अंगद यादव (वय ३४, रा. वाकी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दामोदर हा फिर्यादी अशोक यांच्या बहिणीचा पती आहे. त्याने किरकोळ कारणावरून अशोक आणि त्यांचा चुलत भाऊ मोहन यांना शिवीगाळ केली. अशोक यांच्या हाताला चावा घेऊन तसेच दगडाने मारून जखमी केले. तर मोहन यांना दगडाने मारून जखमी केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.