चिखली, दि. १५ (पीसीबी) : किरकोळ कारणावरून पतीने शिवीगाळ करत पत्नीला बॅटने मारहाण केली. याप्रकरणी मुलीने थेट वडिलांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.हा सारा प्रकार बुधवारी (दि.12) नेवाळे वस्ती, चिखली येथे घडली आहे.
याप्रकरणी 19 वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून 48 वर्,षीय वडिलावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या आईने वडिलांना घरातील किरकोळ कारणावरून हटकले म्हणून आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत, घरातील लाकडी बॅटने डोक्यात तसेच हातावर मारून गंभीर जखमी केले आहे. याविरोधात चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.