किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

0
267

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – किरकोळ कारणावरून दोघांनी दोन तरुणांना मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री साडेबारा वाजता जयभीमनगर दापोडी येथे करण्यात आली.याप्रकरणी स्वप्नील विजय बांबळे (वय 19, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत उर्फ महादेव गणेश पवार (वय 19, रा. दापोडी), एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराजवळ थांबले असताना आरोपी तिथे आले. त्यांनी ‘तू का माझ्याकडे बघतो’ असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर घरातून सुरा घेऊन फिर्यादीवर वार केला. तो वार फिर्यादी यांचा भाऊ निखिल बांबळे यांनी हातावर झेलला असता ते जखमी झाले. फिर्यादी यांच्या मनगटावर जखम झाली. दरम्यान घटनास्थळी आरडाओरडा झाला. लोक बाहेर आले असता आरोपींनी लोकांना शिवीगाळ केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.