किरकोळ कारणावरून तिघांना मारहाण

0
33

चिंचवड, दि. 30 (पीसीबी)
लहान मुलांना का ओरडतोस, असे विचारल्याने दोघांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना २८ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता आनंदनगर, चिंचवड येथे घडली.

किसन लिम्बराज कांबळे (वय ६५, रा. आनंदनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किसन कांबळे, त्यांची पत्नी आणि मुलगा मयूर यांना मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी सानी अशोक मोरे (वय ३७), आण्णा अशोक मोरे (वय २५, रा. आनंदनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या गल्लीत लहान मुले खेळात असताना आरोपी सनी मोरे हा मुलांना ओरडला. त्यामुळे कांबळे यांच्या पत्नीने सनी याला ‘मुलांना का ओरडतोस’ असे विचारले. त्या कारणावरून सनी आणि त्याचा भाऊ आण्णा यांनी फिर्यादी किसन कांबळे, त्यांची आणि मुलगा तुषार यांना हाताने, लोखंडी रॉडने मारहाण केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.