महाळुंगे, दि. 31 (पीसीबी)
तिघांनी मिळून एका तरुणावर भाजी कंपन्यांच्या सुरीने वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. २९) रात्री दहा वाजता निघोजे येथे घडली.
कौशलकुमार सुनील ठाकूर (वय २५, रा. निघोजे, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष अण्णा धांडे (वय २८), कृष्णा अर्जुन धांडे (वय २०) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह एका १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाकूर रविवारी रात्री कामावरून आले तेंव्हा त्यांच्या खोलीतील सहकारी मित्र आणि शेजारच्या गावातील मुलांमध्ये चर्चा सुरु होती. ठाकूर घरी आले असता आरोपी त्यांच्याकडे आले. ‘तुम्ही काय बडबड लावली आहे. तुम्ही इथे टोळी करून काय बेत करत आहात’ असे म्हणून आरोपींनी ठाकूर यांना भाजी कापण्याच्या सुरीने कपाळावर वार केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारून जखमी केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.