किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

0
4138

सांगवी, दि. ९ (पीसीबी)- किरकोळ कारणावरून तरुणाला कोयत्याने मारहाण केली आहे. हि घटना जुनी सांगवी येथे शनिवारी (दि.7) घडली.

फिरोज अब्बास मुलाणी ( वय 38 रा.पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . यावरून माराजुल सिराज शेख (वय 25 रा. जुनी सांगवी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी. दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिकन आणायला गेले असता आरोपीने कोंबडी कापून देतो म्हणत फिर्यादीशी वाद घालण्यास सुरुवात केली. या भांडणातून आरोपीने चिकन कापून देण्याच्या कोयत्याने मारहाण केली. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.