किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

0
76

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) :  किरकोळ कारणावरून तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

गोविंद रामस्वामी अलकुंटे (वय 20, रा. गोडाऊन चौक, मोशी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय शिरसाठ, सुजित बोराडे, बाप्या सरवदे (सर्व रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंद हे विठ्ठलनगर येथून जात असताना सुजित बोराडे याला ‘भाऊ मी चाललो आहे’ असे म्हणाले. त्या कारणावरून सुजित याने गोविंद यांना दमदाटी करत मारहाण केली. इतर आरोपींनी देखील सुजित यांना मारहाण करून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या गोविंद यांचे मामा यांना देखील आरोपींनी शिवीगाळ केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.