किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

0
331

निगडी, दि. ४ (पीसीबी) – पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून लुटले. ही घटना शनिवारी (दि. 2) मध्यरात्री एक वाजता चिकन चौक, ओटास्कीम, निगडी येथे घडली.

किशोर व बड्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय राजेश शिंदे (वय 23, रा. ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय शनिवारी मध्यरात्री चिकन चौकातून त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी विजय यांना रस्त्यात अडवून आरोपींनी त्यांच्याकडे पैसे मागितले. पैसे देण्यासाठी विजय यांनी नकार दिला. त्यावरून आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून पाच हजार रुपये आणि गळ्यातील दोन ग्रॅम वजनाचा आठ हजारांचा सोन्याचा क्रोस काढून घेतला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.