किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

0
106

पिंपरी, दि. 12 जुलै (पीसीबी) – किरकोळ कारणावरून एका तरुणाला मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. तसेच तरुणाच्या आई-वडिलांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री नऊ वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

पियुष रवी कालेकर (वय 19, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश लोंढे, बंटी सुतार, बिट्या, निखिल (पूर्ण नाव माहिती नाही. सर्व रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पियुष यांनी आरोपी प्रथमेश याला फोन करून ‘तू ईश्वरी वाईकर हिला फोन करून त्रास देऊ नकोस’ असे सांगितले. त्याचा राग मनात धरून प्रथमेश याच्या मोबाईल वरून बंटी सुतार याने पियुष यांना फोन केला. त्यांना दत्त मंदिर, संत तुकाराम नगर येथे बोलावून घेतले. तिथे पियुष यांना शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. पियुष तिथून पळून आई-वडिलांकडे गेले. त्यानंतर आरोपींनी पियुष यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. त्यासह आरोपींनी फिर्यादी पियुष यांच्या आई वडिलांना देखील मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.