किरकोळ कारणावरून तरुणांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

0
117

चाकण, दि. 29 (पीसीबी) : किरकोळ कारणावरून 13 जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याचे कारमधून अपहरण केले. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री बालाजीनगर, चाकण येथे घडली.


याप्रकरणी 17 वर्षीय मुलाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन्या उर्फ श्रीपाद कुसळकर, बंटी उर्फ निखिल शेलार, मंथन पंडित, नाना उर्फ अरुण कुसळकर, विकास चव्हाण, अमित उर्फ अण्णा माने, मॉन्टी नाणेकर आणि इतर सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विनाकारण फिर्यादीस दमदाटी करून मारहाण केली. फिर्यादी यांचा मित्र भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याला देखील आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीस एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून नाणेकरवाडी, एमआयडीसी, मेदनकरवाडी, काळुस रस्त्याने आळंदी घाट, नाणेकरवाडी या परिसरात फिरवले. दरम्यान कार मध्ये फिर्यादीस बेदम मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.