किरकोळ कारणावरून कोयत्याने वार

0
394

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – ईद ए मिलाद ची मिरवणूक पाहून घरी निघालेल्या 16 वर्षीय मुलाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 9) रात्री आंबेडकर चौक, पिंपरी येथे घडली.

नागेश देवप्पा ईरमिट्टी (वय 16, रा. गांधीनगर, पिंपरी) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन ते चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागेश आणि त्यांचा मित्र आदित्य सोनपाखरे असे ईद ए मिलादची मिरवणूक पाहण्यासाठी आंबेडकर चौक पिंपरी येथे गेले होते. मिरवणूक झाल्यांनतर ते घरी जात असताना तीन ते चार जणांनी त्यांना अडवले. जाताना आम्हाला साईड का दिली नाही, असे म्हणून एकाने नागेश यांच्यावर कोयत्याने वर केला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.