किरकोळ कारणावरून कामगारांना मारहाण; ठेकेदारावर गुन्हा दाखल

0
73

निगडी,दि. 08 (पीसीबी)

किरकोळ कारणावरून ठेकेदाराने दोन कामगारांना मारहाण केली. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी निगडी येथे घडली.

नरेशकुमार सिन्हा (वय 35, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार नारायण (पूर्ण नाव माहिती नाही, वय 35, रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नारायण हा फिर्यादी यांचा ठेकेदार आहे. त्याने फिर्यादी यांना तू माझ्या साइटवरून तुझ्या भावांना का घेऊन जातो, असे म्हणत बांबूने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या भावाला देखील मारहाण करून जखमी केले. आरोपीने शिवीगाळ करून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.