किरकोळ कारणावरून एकास मारहाण

0
111

भोसरी, दि. 21 (पीसीबी) : गाडी बाजूला घे म्हणत एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी धावडे वस्ती, भोसरी येथे घडली.

अजिंक्य तानाजी कुदळे (वय 33, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकनाथ सुदाम जाधव (वय 37, रा. दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धावडे वस्ती येथे इंदल नर्सरी मध्ये गाडीतून कुंड्या खाली करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने अजिंक्य यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यानुसार कुंड्या खाली करून झाल्या की गाडी बाजूला घेतो, असे अजिंक्य यांनी आरोपीला सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने अजिंक्य यांना शिवीगाळ करत गाडीतील लोखंडी टॉमीने बेदम मारहाण केली. अजिंक्य यांचा मित्र सुनील प्रजापती याच्या अंगावर मारण्यासाठी आरोपी धावून गेला. पोलिसांनी आरोपी एकनाथ जाधव याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.