किरकोळ कारणावरून एकाचा खून

0
115

दिघी, दि. 13 (पीसीबी)

किरकोळ कारणावरून वृद्ध व्यक्तीच्या डोक्यात फावड्याने मारून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री नऊ वाजताच्या सुमारास आळंदी-पुणे रोडवर काळेवाडी येथे घडली.

पंडित श्रावण पाटील (वय 59, रा. चऱ्होली बुद्रुक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील पंडित पाटील (वय 34) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्जुन पांडुरंग काळे (वय 78, रा. काळेवाडी, ता. हवेली( याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन काळे आणि फिर्यादी यांचे वडील पंडित पाटील यांचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या कारणावरून अर्जुन काळे याने फावड्याने पंडित पाटील यांच्या डोक्यात मारले. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन पंडित पाटील यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अर्जुन काळे याला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.