किरकोळ अपघाताच्या कारणावरून मारहाण

0
85

आळंदी, दि. 29 (पीसीबी) : दोन कारमध्ये झालेल्या किरकोळ अपघाताच्या कारणावरून तीन जणांनी एकाच कुटुंबातील चौघांना खोरे, कुदळीने मारहाण केली. ही घटना सोमवारी (२८ ऑक्टोबर) मरकळ मधील नाणेकर वस्ती येथे घडली.

नवनाथ तुकाराम नाणेकर (वय ४८, रा. नाणेकर वस्ती) यांनी या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिकेत राजाराम लोखंडे (वय ३०), अक्षय अशोक लोखंडे, अशोक देवराम लोखंडे (सर्व रा. मरकळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्या कारचा किरकोळ अपघात झाला. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ केली. हातात खोरे, कुदळीचा दांडा, लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी यांच्या मोठ्या मुलाला व वयस्कर वडील तुकाराम नाणेकर यांना मारहाण केली. फिर्यादी यांचा लहान मुलगा भागवत नाणेकर याच्या डोक्यात कुदळीचा दांडा मारून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत पसरविली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.