किचन खिडकीच्या स्लाइडिंग मधून २२ लाखाची घरफोडी

0
371

पुणे, दि. २७ (पीसीबी) : किचनच्या खिडकीचे स्लाइडिंग उघडून घरामध्ये प्रवेश करीत २२ लाख ५० हजार रुपये किमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोकड, डायमंड आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. घरफोडीची ही घटना शनिवारी रात्री साडेदहा ते रविवारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक विलास जगताप (वय ५२, रा. मिथिला बंगला, अशोक नगर, भोसले नगर) यांनी फिर्यादी दिली आहे. जगताप हे यांच्या घराच्या खिडकीच्या स्लाइडिंग अज्ञात चोरट्यांनी कशाच्यातरी साह्याने उघडले. खिडकीवाटे घरात प्रवेश करून दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बेडरूममध्ये प्रवेश केला. तेथील वॉर्डरोब उघडून त्यामध्ये असलेले लॉकर फोडले. त्यामध्ये असलेला ऐवज चोरी करून नेला.