काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे – रोहित पवार

0
249

मुंबई, दि. २३ (पीसीबी ) – शरद पवार गटाचे एक खासदार आणि एक आमदार हे अजित पवार गटात जाण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांच्याकडून अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे. सही कर नाहीतर तुझ्यासंदर्भात कारवाई केली जाईल. सही नाही केलीस तर कारवाईचा बडगा उचलला जाईल, असं सांगितलं जात असावं, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “एखादं महत्त्वाचं काम तोपर्यंत आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, जोपर्यंत तुम्ही सही करत नाही, असेही प्रकार घडत आहेत, असं आम्हाला कळतंय. अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंगचे प्रकार केले जात आहेत, असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला आहे.