पुणे , दि. ५ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणारे मोठ – मोठे प्रकल्प वेदांता फॉक्सकॉन , टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क असे अनेक उद्योग गुजरातला गेले आणि इथल्या राज्यातील तरुणांना बेरोजगार केले. आता उरलेसुरले प्रकल्प,कंपन्या उत्तर प्रदेशला घेऊन जाण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईला आलेले आहेत. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलेलेच आहे आणि इथले प्रकल्प देऊन तरुणांना बेरोजगारीच्या खाईत टाकण्याची मुक समिती देण्यात येत आहे. काही गुजरातला न्या..काही कर्नाटकाला न्या… आणि उरलेले उत्तर प्रदेशला न्या..महाराष्ट्राला मात्र बेरोजगार करा असे धोरण असल्याची टीका कष्टक-यांचे नेते काशिनाथ नखाते यांनी केली.
उत्तर प्रदेश मध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. यामध्ये मुंबईतील बडे उद्योग, बड्या कंपन्यावरती त्यांचा डोळा असून मुंबईतून पळवून नेण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मात्र उद्योग न वाढवता त्याला संमती देत आहेत अशी स्थिती दिसून येत आहे. आपल्या राज्यामध्ये उद्योग वाढावेत रोजगार निर्माण व्हावेत म्हणून इतर राज्याचे मुख्यमंत्री इतर राज्यात जाऊन प्रयत्न करीत आहेत.
मात्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री इथे असलेले प्रकल्प त्यांची व्याप्ती वाढावी त्यांचे गुंतवणूक वाढवून अनेक लोकांना रोजगार मिळावे. उद्योगांमध्ये भरभराट व्हावी यासाठी प्रयत्न न करता इतर राज्याला सरळ हाताने मदत करून प्रकल्प देऊन इथल्या लोकांना बेरोजगार करत असल्याचे चित्र महाराष्ट्र पाहत आहे हे दुर्दैव असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.