कासारसाई येथे तरुणावर कोयत्याने वार

0
627

कासारसाई, दि. ५ (पीसीबी)- कासारसाई येथे एकावर कोयत्यानेवार करतगंभीर जखमी केले आहे. ही घटना रविवारी (दि.3) सायंकाळी घडली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे,

याप्रकरणी परशुराम हनुमंत शेडगे (वय 26 रा. कासारसाई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली वरून पोलिसांनी आरोपी सचिन अशोक भिंताडे (वय 43 रा.कासारसाई) याला अटक केली आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील हनुमंत शेडगे हे दारु पिण्यासाठी घरातून निघाले. त्यावेळी फिर्यादीने हे त्यांना अडवण्यासाठी गेले. फिर्यादीचे वडील आरोपीच्या घरासमोर गेले असता फिर्यादी त्यांना दारु पिऊ नका समजवत होते. यावेळी आरोपीच्या पत्नीने आरोपीला फोन करून बोलावून घेतले.आरोपी रिक्षातून आले व त्याने तुला संपवतो च म्हणत जवळ पडलेल्या कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात, कपाळावर वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.