कासारसाई धरणात तरुण बुडाला

0
152

मावळ तालुक्यातील कासारसाई धरणात पोहायला गेलेला एक तरुण बुडाला. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी घडली.

माधव हरगौरी सिंग (वय 17, रा. नाशीक एमआयडीसी) असे बदललेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माधव सोमवारी दुपारी कासारसाई धरणात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. सोमवारी सायंकाळी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ या संस्थेचे सदस्य गेले. मात्र अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळे येऊ लागले. त्यामुळे सोमवारी सायंकाळी शोधकार्य थांबवण्यात आले.

मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले. सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास माधव याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. निलेश गराडे , अनिल आंद्रे, विनय सावंत, शुभम काकडे, आवी कारले, प्रथमेश सुपेकर, रमेश कुंभार, कुणाल दाभाडे, वैभव वाघ यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.