कासारवाडी येथील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

0
205

कासारवाडी, दि. १० (पीसीबी) – कासारवाडी येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी दिनांक आठ रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास हॉटेल निसर्ग येथे करण्यात आली.

अजय प्रेमानंद भालेराव (वय 22, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. बीड), विकास नरेंद्र साहू (वय 21, रा. कासारवाडी. मूळ रा. मध्य प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावर कासारवाडी येथे असलेल्या निसर्ग हॉटेलमध्ये आरोपींनी ग्राहकांना जेवण करत असताना त्यांना जेवणासोबत धूम्रपानासाठी हुक्का पदार्थ पुरविला. तसेच हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.