काळेवाडीत वाईन शॉप, ज्वेलर्स शॉप फोडले

0
95

वाकड, १८ जुलै (पीसीबी) -काळेवाडी येथील रोहन वाईन शॉप आणि त्याशेजारी असलेले ममता ज्वेलर्स ही दोन दुकाने फोडण्यात आली. दुकानातून डीव्हीआर मशीन आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना बुधवारी (दि. 17) पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास घडली.हिमांशू प्रदीप करीरा (वय 36, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करीरा यांचे काळेवाडी येथे रोहन वाईन शॉप आहे. त्यांनी मंगळवारी रात्री वाईन शॉप कुलूप लाऊन बंद केले. त्यानंतर बुधवारी पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी दुकानाचे चनल गेट आणि मुख्य लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला. वाईन शॉप मधून चोरट्यांनी 10 हजार रुपये किमतीचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला.त्यानंतर चोरट्यांनी शेजारी असलेल्या ममता ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून दोन हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.