काळेवाडीत प्लायवूडचे दुकान फोडले

0
288

काळेवाडी, दि. ५ (पीसीबी) – जगताप डेअरी चौकात अज्ञात चोरट्याने प्लायवूडचे दुकान फोडले. दुकानातून एक लाख 84 हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे. ही घटना 29 जून रोजी सायंकाळी साडेसात ते 30 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या कालावधीत घडली.

विवेक दर्शन कुमारगोयल (वय 52, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे जगताप डेअरी चौकात प्लायवूडचे दुकान आहे. अज्ञाताने दुकानाचे शटरचे स्क्रू काढून कुलूप कापून शटर उचकटले. दुकानात प्रवेश करून एक लाख 84 हजार 800 रुपये किमतीचे युरो कंपनीचे 15 ड्रम चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.