काळेवाडीतील तरुणाने टिपला दुर्मिळ Iridescence ढग

0
531

पिंपरी,दि.१४(पीसीबी) – निसर्ग दररोज वेगवेगळ्या रुपात आपलं सौंदर्य दाखवत असतो. प्रत्येक काळात, प्रत्येक ऋतुत वेगवेगळी रुपं धारण करणारा निसर्ग कधी कधी असं रुप दाखवतो, जे शतकातून एकदाच दिसतं. असा नजारा दिसला की लोक आनंदाने फुलून जातात आणि ते दृष्य नजरेत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही वर्षांपूर्वी निसर्गाचे असे चमत्कार ज्या भागात घडायचे, त्याच भागातील नागरिकांना ते पाहता येत असत. मात्र कॅमेऱ्याचा शोध लागल्यापासून आणि गेल्या काही वर्षात मोबाईल क्रांती झाल्यापासून जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घडणारा निसर्गाचा चमत्कार कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून ठेवता येऊ शकतो. असाच एक चमत्कार पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी येथे घडला आहे. इंद्रधनुष्य तर आपण अनेकदा पाहिलेलं असतं. मात्र आकाशात दाटी केलेल्या ढगांनीच इंद्रधनुष्याचा रंग धारण केल्याचं सहसा दिसत नाही. सध्या काळेवाडीतील तरुणाने टिपलेल्या ह्या फोटोत नेमका हाच चमत्कार दाखवतो.

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथे शुक्रवार 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:33 वाजता दुर्मिळ दुर्मिळ iridescence ढग दिसले. काळेवाडीतील सुयश गोरे ह्या तरुणाने आपल्या कॅमेरात हे विलोभनीय असे दृश्य कैद केले आहे.

जणू ढगांनी सप्तरंगी कपडे घातले आहेत आणि वरून रंगीबेरंगी मुकूट धारण केला आहे, असं हा फोटो पाहून वाटतं. कॅमेऱ्यात जर हा निसर्गाचा चमत्कार इतका विलोभनीय दिसत असेल, तर प्रत्यक्षात तो किती अद्भूत असेल, याचा विचार अनेकजण करत आहेत. असा चमत्कार कित्येक वर्षातून पाहता येतो. निसर्ग हा चमत्कार कधी दाखवेल, याचा कुणालाही अंदाज येऊ शकत नाही. या प्रकाराला ‘स्कार्फ क्लाऊड’ असं म्हटलं जातं.

Iridescence ढग म्हणजे काय ?
१) अल्टोक्यूम्युलस मोठ्या, गुळगुळीत वैयक्तिक ढगांच्या स्वरूपात असतो. अल्टोक्यूमुलस ढग सर्वात नाट्यमय आणि सुंदर ढग निर्माण करतात, विशेषत: कमी सूर्याच्या किरणांमध्ये.

२) इरिडेसेन्स हा पेस्टल रंगांच्या पट्ट्यांचा सुंदर प्रभाव आहे जो सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाश पातळ ढगातून जातो तेव्हा दिसू शकतो. ‘इरिसेशन’ म्हणूनही ओळखले जाते, हे मोत्याचे मातेचे रंग ढगातून जाताना प्रकाश विचलित झाल्यामुळे होतात. हीच प्रक्रिया सूर्य किंवा चंद्राभोवती रंगीत चकती निर्माण करते, ज्याला कोरोना म्हणतात. ढगाच्या लहान थेंबांमधून किंवा बर्फाच्या स्फटिकांभोवती फिरताना प्रकाश लहरी विखुरल्या जातात, वेगवेगळ्या तरंगलांबी वेगवेगळ्या प्रमाणात पसरल्या जातात. प्रत्येक तरंगलांबी प्रकाश आणि गडद किनार्यांचा हस्तक्षेप नमुना देखील तयार करू शकते. या सर्वांचा अर्थ असा आहे की सूर्यप्रकाश रंगांच्या पर्यायी किनार्यांमध्ये विभागला जातो.

३) थेंब किंवा बर्फाचे स्फटिक असलेले कोणतेही पातळ ढग पुरेसे लहान आणि एकसमान इंद्रधनुषी रंग तयार करू शकतात. सनग्लासेसद्वारे उत्तम प्रकारे पाहिल्या जाणार्‍या, पेस्टल रंगछटांचे पट्टे ऑइल स्लीक्सवरील ची आठवण करून देतात आणि पातळ स्ट्रॅटोक्यूम्युलस, अल्टोक्यूम्यलस, सिरोक्यूम्युलस आणि अल्टोस्ट्रॅटसवर दिसू शकतात.

रंगीत ढग