काळभोरनगरमध्ये विरूद्ध दिशेने धोकादायक पध्दतीने जीव धोक्यात घालुन रस्ता क्राॅसिंग

0
276

तातडीने उपाययोजना करा; राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस विशाल काळभोर यांची मागणी

पिंपरी दि. २० (पीसीबी) – मुंबई-पुणे महामार्गावरील काळभोरनगर येथील भुयारी मार्गातून काळभोरनगरमध्ये प्रवेश करताना वाहनांना येण्या- जाण्याकरीता रोज विरुद्ध दिशेने धोकादायक पध्दतीने जीव धोक्यात घालुन रोड क्रॉस करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंगही होत आहेत. पादचारी आणि दुचाकी चालक जीव धोक्यात घालून रस्ता क्राॅस करत आहेत. त्यामुळे याठिकाणी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.

याबाबत काळभोर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. यावेळी खंडेराव काळे, सतीश बाराहाते, निखिल पवार, सचिन मोकाशी, विकास ठाणांबीर, विशाल सजगणे, संदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे की,
मुंबई-पुणे महामार्गावरील काळभोरनगर येथील भुयारी मार्गातून काळभोरनगरमध्ये प्रवेश करताना वाहनांना येण्या- जाण्याकरीता रोज विरुद्ध दिशेने धोकादायक पध्दतीने जीव धोक्यात घालुन रोड क्रॉस करावा लागत आहे. तसेच परिसरात शाळा, कॉलेज, शॉपिंग मॉल आहे. हा रस्ता अतिशय रहदारीचा असल्यामुळे स्थानिक नागरीकांना हा त्रास कित्येक वर्ष सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागात वारंवार अपघात व त्यातून वादविवाद होत आहेत. वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याचा स्थानिक नागरीकांना रोज मनस्ताप होत आहे. या परिसराची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विशाल काळभोर यांनी केली आहे.