कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळे संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?

0
55

छत्रपती संभाजीनगर, दि. १९ (पीसीबी) –

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. मात्र या प्रकरणानंतर संजय शिरसाठ यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

संजय शिरसाठ यांचा त्या प्रकरणाशी संबंध नाही :
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभेचे शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. कारण कालीचरण यांनी जे विधान केलं तो कार्यक्रम संजय शिरसाटांनी आयोजित केल्याच्या बातम्यांचं त्यांनी स्वत: खंडन करताना आपला या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचं शिरसाठ म्हणाले आहेत.

मात्र मराठवाड्यातील अनेक उमेदवारांना घाम फोडणारं कालीचरण महाराजांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं? हे आपण जाणून घेऊयात…

कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले? :
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे पाटलांचा उल्लेख हा ‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’ असा केला होता. मात्र मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे असं कालीचरण महाराज म्हणाले होते.

तसेच पेट्रोल, दरवाढ व भाववाढीवर मतदान केल्यास हिंदू राजा सत्तेत कसा बसेल? असा सवाल कालीचरण महाराजांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना केला होता. मात्र ते मुस्लिम मौलवींच्या सांगण्यावरून मतदान करतात, त्यामुळे तुम्ही हिंदू हितांसंदर्भात बोलणाऱ्यांनाच मतदान करावं असं आवाहन देखील कालीचरण यांनी केलं होतं.