कार व पिकअपच्या अपघातात तरुणीचा मृत्यू

0
89

चाकण, दि. 25 (पीसीबी) : कारला पिक अपने समोरून धडक दिली. या अपघातात कारमध्ये बसलेल्या एका तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 24) चाकण येथे घडला.

हर्षदा केतन खांडेकर (वय 27 रा. नारायणगाव जुन्नर) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रामेश्वर गणपत सांगवे (वय 23) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी पिकअप चालक सचिन मुरलीधर गोरे (वय 29 रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची कार घेऊन मुंबईकडे जात होते. यावेळी कारमध्ये हर्षदा या पाठीमागे बसल्या होत्या. गाडी चाकण येथील रसिका हॉटेल समोर आली. आरोपीने त्याच्या ताब्यातील पिकअपने फिर्यादी यांच्या कारला समोरून जोरात धडक दिली या अपघातात हर्षदा व फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. हर्षदा यांना जवळील खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.