कार मागितल्याच्या रागातून तरुणाचा कानाचा पडदा फाडला

0
225

हिंजवडी,दि २७ (पीसीबी) – कार घेऊन जाण्यासाठी आला त्याच्या रागातून तरुणाला मारहाण करत चक्क त्याच्या कानाचा पडदा फाडला आहे. यावरून एकावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 31 मे 2023 रोजी मान येथे घडला आहे याप्रकरणी जयदीप मधुसूदन मंडल (वय 38 राहणार हडपसर) यांनी सोमवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विष्णू राजपुरोहित (राहणार माणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र राशीत याच्यासोबत कार घेऊन जाण्यासाठी आले होते. याचा राग घेऊन आरोपीने ऑफिसचे शटर बंद करत फिर्यादी यांना शिवीगाळ केली व त्यांच्या कानावर मारहाण केली यातून फिर्यादी यांच्या कानाचा पडदा फाटला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.