कार मधून दीड लाखाचे दागिने चोरीला

0
372
Vandalism car window

चऱ्होली, दि. ८ (पीसीबी) – कारमध्ये ठेवलेले दीड लाखाचे दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. ४) चोविसावाडी च-होली बुद्रुक येथे घडली.

याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या कारमध्ये दागिने असलेली बॅग गुरुवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास ठेवली. त्यांच्या कार मधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे नेकलेस, कानातले असे ४०.५ ग्रॅम वजनाचे दीड लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. फिर्यादी यांचा कार चालकावर संशय आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.