कार मधून चार लाखांची रोकड चोरीला

0
174

कारची काच फोडून कारमधून तब्बल चार लाखांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना सोमवारी (दि.3) सकाळी साडे आठ ते दहा या कालावधीत चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय नागरिकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या आयटेन कार मध्ये हॅन्ड ब्रेकला एक बॅग अडकवली होती त्या बॅगेमध्ये 3 लाख 95 हजार रुपये होते. चोराने ड्रायव्हर साईडचे काच फोडून ती पिशवी चोरून नेली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.