कार थांबवून चालकाची सोनसाखळी पळवली

0
194

वाकड, दि. १५ (पीसीबी) – कार चालकाला अडवून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना वाघमारे सब वे जवळ, वाकड येथे मंगळवारी (दि. 13) मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.

दिपक नथ्थु पाटील (वय 26, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्राला भूमकर चौकातील सीसीडी येथे सोडून कार मधून घरी जात होते. ते वाघमारे सब वे जवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना हात करून थांबवले. फिर्यादींनी कारची काच खाली घेती असता आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील 16.19 ग्रॅम वजनाची 48 हजार 570 रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.