कार घासल्याच्या कारणावरून टोळक्याकडून एकास बेदम मारहाण

0
2383

हिंजवडी दि,११ (पीसीबी) – कारला कार घासून गेली. या कारणावरून एका कार मधील दोघांनी त्यांच्या साथीदारांना बोलावून दुसऱ्या कार मधील व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री सव्वानऊ वाजता साखरे वस्ती रोड, हिंजवडी येथे घडली.

पप्पू कुमार सहदेव प्रसाद गुप्ता (वय 39, रा. हिंजवडी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास प्रकाश साखरे (वय 25), आदित्य कैलास मातेरे (वय 21), रितेश (पूर्ण नाव माहिती नाही), लाल जांभुळकर (सर्व रा. साखरे वस्ती, हिंजवडी) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मार्केट यार्ड येथून भाजीपाला घेऊन त्यांच्या कार मधून हिंजवडी येथे जात होते. साखरेवस्ती येथील जांभुळकर जिम जवळ आरोपीने त्याच्या कारने फिर्यादीस ओव्हरटेक केले. त्यावेळी आरोपीची कार फिर्यादी यांच्या कारला घासली. यावरून आरोपींनी त्यांच्या अन्य साथीदारांना बोलावून घेत फिर्यादीस बेदम मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.