कार काढण्यास सांगितल्याने दुकानाची तोडफोड

0
184

पिंपरी दि.१ (पीसीबी) दुकानासमोर लावलेली कार काढण्यास सांगितल्याने चौघांनी मिळून एकाला मारहाण करत दुकानात तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 31) सकाळी वाघेवस्ती, चाकण येथे घडली.

रमेश गणपत पुरोहित (वय 48, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप सोमनाथ उटे (रा. नाशिक), गहिनीनाथ नारायण उटे (वय 71), गौतम गहिनीनाथ उटे (वय 30), हर्षल रामनाथ उटे (वय 26, तिघे रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप याने त्याची कार फिर्यादी यांच्या दुकानासमोर पार्क केली होती. फिर्यादींनी कार बाजूला घेण्यास सांगितले असता आरोपींनी फिर्यादीच्या दुकानात घुसून मारहाण व शिवीगाळ केली. आरोपी गौतम याने फिर्यादी यांच्या मानेवर लाकडी दांडक्याने व पाण्याच्या जारने मारहाण केली. दुकानात तोडफोड करत 10 हजारांचे नुकसान केले. पोलिसांनी प्रदीप, गहिनीनाथ आणि गौतम या तिघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.